⚡मालवण ता.०६-:
समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग व बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. शाळा कोळंब कातवड शाळा येथे विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी बार्टीचे मालवण तालुका समतादूत संग्राम कासले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विद्यार्थी दिनाविषयी माहिती दिली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक नारायण पराडकर, उपशिक्षिका प्रीतम पारकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीतम पारकर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक नारायण पराडकर यांनी मानले. समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग चे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे व बार्टीचे विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला.
