Headlines

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सेवा शक्ती संघटना आक्रमक…

चार दिवसांत प्रश्न मार्गी लावा: अन्यथा आंदोलन छेडणार; प्रशासनाला दिला इशारा..

⚡सावंतवाडी ता.०५-: भाजपप्रणित सेवा शक्ती एसटी कर्मचारी संघटनेची बैठक सावंतवाडी एसटी आगार व्यवस्थापक यांच्या दालनात पार पडली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले.

यावेळी अॅड. तथा उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर आणि अॅड. सिद्धार्थ भांबुरे यांनी एसटी विभाग नियंत्रक दीपक घोडे, आगार व्यवस्थापक मणेरे आणि स्थानक प्रमुख कुबडे यांच्यासमोर विविध प्रश्नांचा भडिमार केला.

वाहतूक नियंत्रक संजय पुनाळेकर यांच्याकडून प्रशासनाच्या कामकाजात होत असलेला कथित हस्तक्षेप, तसेच एलिकेशन अधिकारी धुरी यांच्या मनमानी कारभाराबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित प्रकारांना तातडीने आळा घालण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
सेवा शक्ती संघटनेचे सावंतवाडी आगार अध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न चार दिवसांत निकाली काढावेत, अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाला दिला.

यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भरत चव्हाण आणि कामगार मोर्चाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अशोक राणे यांनी सेवा शक्ती संघटनेने जाहीर केलेल्या संपाबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या बैठकीला कुडाळ आगार सचिव प्रशांत गावडे, सावंतवाडी आगार सचिव बी. एस. माणगावकर, बी. जे. तुळसकर, मगदूम शेख, बी. आर. वरख, एस. एच. सावंत, एल. के. बरागडे, संदीप सावंत, प्रवीण आचरेकर, प्रवीण साळगावकर, अभय राणे, वेंगुर्ला आगार सचिव दाजी तळवणकर, भाऊ सावळ यांच्यासह मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page