Headlines

मामा वरेरकर नाट्यगृहात रंगभूमी दिनानिमित्त रंगदेवतेचे पूजन…

मालवण (प्रतिनिधी)
मराठी रंगभूमीच्या १८३ वर्षाच्या अजोड परंपरेला मानाचा मुजरा करीत आज मालवण मधील नाट्यकर्मी, नाट्य कलाकार, नाट्यप्रेमी नागरिकांनी मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृह येथे मराठी रंगभूमी दिन साजरा करीत रंगदेवतेला अभिवादन केले . यावेळी मालवणच्या नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्या हस्ते श्रीफळाचे विधिवत पूजन करीत रंगभूमीला वंदन केले

मालवणच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या स्व. मामा वरेरकर नाट्यगृहाच्या रंगमंचावर आजपर्यंत अनेक दिग्गज तसेच स्थानिक कलाकारांनी आपली कला सादर करत रंगदेवतेची व रंगभूमीची सेवा केली आहे. याच नाट्यगृहात कला सादर करत अनेक स्थानिक कलाकारांनी नाट्य व कला क्षेत्रात उत्तुंग झेप घेतली आहे. रंगभूमीची सेवा अशीच घडत रहो आणि मामा वरेरकर नाट्यगृह कालानुरूप अधिकाधिक वृद्धिंगत व सुसज्ज व्हावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी नगरराध्यक्षा सौ ममता वराडकर यांनी उपस्थित नाट्य कलाकारांना रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याधिकारी प्रतीक थोरात, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक सिद्धार्थ जाधव, नगरसेवक ललित चव्हाण, नगरसेवक महेश कोयंडे, शिंदे शिवसेना शहरप्रमुख राजू बिडये, राज्य नाट्य स्पर्धा मालवण केंद्र समन्वयक संजय शिंदे, सुभाष कुमठेकर, भाई मांजरेकर,शाम वाक्कर, वैभव मांजरेकर व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page