⚡वेंगुर्ला ता.०५-: वन्यप्राण्यांच्या अवयवांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीचा वनविभागाने पर्दाफाश केला होता.
या प्रकरणातील वनकोठडी सुनावण्यात आलेल्या मुख्य संशयित रोहिदास हरिश्चंद्र कामत (वय ४८ रा. वायंगणी, वेंगुर्ला ) व विजय रविराज शिंदे (वय 31,रा. मुळदे, ता. कुडाळ ) यांना
सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी व कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी गुरुवारी कुडाळ न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वाघनखे विक्री करण्यासाठी अडीच लाख रुपयांचा व्यवहार ठरविण्यात आला होता. या व्यवहारादरम्यान वनविभागाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून वाघाचा 1 दातसुळा, बिबट्याची 2 नखे आणि सोन्यामध्ये मढवलेले 2 सुळे जप्त करण्यात आले होते. ही कारवाई कुडाळ येथील काळप नाका बस डेपोच्या प्रवेशद्वारावर करण्यात आली होती.

