प्रतीक बांदेकर निर्दोष की दोषी..? भाजप-शिंदे शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप; चौकशी करून सत्य बाहेर आणण्याचे नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांचे आश्वासन..
⚡सावंतवाडी ता.०५-:
पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांच्या राजीनाम्यावरून गुरुवारी झालेल्या मासिक बैठकीत सत्ताधारी भाजप आणि विरोधी शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकात खडाजंगी झाली.
पाणीपुरवठा विभागातील बिले मंजुर झाली नाहीत त्यामुळे बांदेकर निर्दोष आहेत पाणीपुरवठा समितीतील सदस्यानाही हे माहित आहे असे नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी सांगितले त्यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या शर्वरी धारगळकर यांनी ती बिले मंजूरच झाली नसल्याचे सांगितले असता सत्ताधारी भाजपचे सुधीर आडीवरेकर यांनी मग तुम्ही बांदेकर यांचा राजीनामा का मागितला तुम्ही नाहक बदनामी का केली असा सवाल उपस्थित करत त्यांना धारेवर धरले.
यावर शिंदे शिवसेनेचे गटनेते बाबू कुडतरकर यांनी आम्ही राजीनाम्याची मागणी केली हे सत्य आहे पण ते निर्दोष असतील तर तुम्ही राजीनामा का घेतला असा सवाल केला.यावर पक्षाची बदनामी होऊ नये म्हणून वरिष्ठांच्या आदेशानुसार राजीनामा घेण्यात आला आहे या संदर्भात चौकशी करण्यात येईल त्यानंतर सत्य बाहेर निघेल असे नगराध्यक्षांनी अखेर स्पष्ट केले.
सावंतवाडी नगर परिषदेची मासिक बैठक नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडे कर मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते. या सभेत
पाणीपुरवठा विभागाचा राजीनामा मागच्या सभेत प्रतीक बांदेकर यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिला होता तो मंजूर करून नवीन सभापती नियुक्ती बाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करायचा होता यासंदर्भातील विषय आजच्या सभेत आला यावर झालेल्या चर्चेत सत्ताधारी गटाच्या नगरसेविका सुनीता पेडणेकर यांनी काँग्रेसचे नगरसेवक तौकीर शेख यांच्याकडे पाणी पुरवठा विभागातील गैरव्यवहाराबाबत पुरावे आहेत ते त्यांनी सादर करावेत असे सांगितले तौकीर शेख यांनीही सभापती प्रतीक बांदेकर हे निर्दोष असून या सर्वाला मुख्याधिकारी जबाबदार असून चौकशी केल्यास ते स्पष्ट होईल असे सांगितले नगराध्यक्षा भोसले यांनी पाणीपुरवठा विभागातील बिले मंजुर झाली नाहीत त्यामुळे बांदेकर निर्दोष आहेत पाणीपुरवठा समितीतील सदस्यानाही हे माहित आहे असे सांगितले त्यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या शर्वरी धारगळकर यांनी पाणीपुरवठा विभागातील ती बिले मंजूरच झाली नसल्याचे सांगितले त्यावेळी सत्ताधारी भाजपचे सुधीर आडीवरेकर यांनी मग तुम्ही बांदेकर यांचा राजीनामा का मागितला तुम्ही नाहक बदनामी केली? पत्रकार परिषद घेऊनही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असा आरोप करत शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांना धारेवर धरले, सुनिता पेडणेकर यांनी बांदेकर यांचा राजीनामा घेऊ नये अशी सूचना केली. तर शिवसेना शिंदे गटाचे गटनेते बाबू कुडतरकर यांनी सभा पटलावर विषय एक असताना भलती चर्चा कशासाठी करण्यात येत आहे असा सवाल केला आम्ही राजीनाम्याची मागणी केली हे सत्य आहे पण ते निर्दोष असतील तर तुम्ही राजीनामा का घेतला असा सवाल केला. नगराध्यक्ष भोसले यांनी पक्षाची बदनामी होऊ नये म्हणून वरिष्ठांच्या आदेशानुसार राजीनामा घेण्यात आला आहे या संदर्भात चौकशी करण्यात येईल त्यानंतर सत्य बाहेर निघेल असे स्पष्ट केले. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी आपल्यावरील आरोप निराधार असल्याचे स्पष्ट करत आपण चौकशीला तयार असल्याचे सांगितले या चर्चेत भाजपच्या दुलारी रांगणेकर मोहिनी मडगावकर सिद्धार्थ भांबुरे यांनी भाग घेतला शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी आपण चौकशी बाबत पत्र दिले होत असे स्पष्ट केले.
तर नगरपालिकेच्या संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या नवीन इमारतीच्या कामाच्या ठिकाणी वाहन तळाच्या भागात वॉटरप्रूफिंग आणि अन्य कामासाठी 38 लाख रुपये ज्यादा खर्च झाले तो खर्च नगरपालिकेच्या फंडातून मिळावा अशी मागणी विकासाकाकडून करण्यात आली आहे या विषयावर सत्ताधारी गटाचे सुधीर आडिवरेकर यांनी विरोध करत संबंधित विकासकाने शासनाकडून हा खर्च वसूल करावा वैशिष्ठ पूर्ण योजनेतून त्यासाठी निधी मंजूर करावा. नगरपालिकेच्या फंडातून त्याला पैसे देण्यात येऊ नये असे स्पष्ट केले.तर तसा प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नगराध्यक्ष भोसले यांनी स्पष्ट केले. सिद्धार्थ भांबुरे यांनी या सर्वाला संबंधित आर्किटेक जबाबदार असून या आर्किटेकने अन्य कामाबाबत असाच प्रकार केला त्यामुळे या आर्किटेक ला पॅनलवर घेऊ नये अशी सूचना केली. सर्वोदय नगरातील खुली जागा विकसित करण्याच्या कामाला मुदत वाढ देण्याचा विषय सभेत आला संबंधित ठेकेदाराने बिलो दरात काम घेतले तेथे काम अडवण्यात आले पालिकेची जागा असताना तेथे नागरिकांनी झाडे लावली त्यामुळे ठेकेदाराला वेळेत काम पूर्ण करता आले नाही त्यामुळे त्याच्यावर दंड न आकारता मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी नगरसेवक अजय गोंदावळे यांनी केली तर नगराध्यक्ष भोसले
यांनी यासंदर्भात तपासणी करून निर्णय घेण्याची सूचना केली यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे देवा टेमकर यांनी अनेक ठेकेदार बिलोदराने कामे घेतात त्यामुळे ही कामे दर्जाहीन होत आहेत त्यामुळे बिलोदराने कामे देण्यात येऊ नये असे स्पष्ट केले. शिवसेना शिंदे गटाचे बाबू कुडतरकर यांनीही कामाचा दर्जा योग्य रहावा यासाठी बिलोदराने कामे देण्यात येऊ नये तसा अधिकार नगराध्यक्षांना असल्याचे सांगितले नगराध्यक्षांनीही यापुढे बिलोदराने कामे देण्यात येणार नाही अस स्पष्ट केले उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी कुडतरकर यांची सूचना नोंद करण्यात यावी असे स्पष्ट केले. सर्वोदय नगर आणि गणेश नगर मध्ये निळ पाणी योजना आणि गॅस पाईपलाईन चे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे त्या ठिकाणी खोदलेल्या रस्त्यांचे काम अद्याप सुरू न झाल्याने त्या ठिकाणी अपघाताचे सत्र सुरू आहे त्यामुळे संबंधित भागातील कामे त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी नगराध्यक्षांकडे केली दरम्यान संबंधित ठेकेदारांशी यासंदर्भात बोलणे झाले असून तात्काळ काम सुरू करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. एम एन जी एल कंपनीचे कार्यालय सावंतवाडी मध्ये नसल्याने अनेक ग्राहकांना तक्रार नोंदवण्यास अडचण निर्माण होते त्यामुळे सदरचे कार्यालय सावंतवाडी सुरू व्हावे यासाठी आपण लक्ष घालावे अशी मागणी नगरसेविका नीलम नाईक यांनी केली.
इंदिरा गांधी व्यापारी संकुलनात एकाच व्यक्तीच्या नावे दोन गाळे असल्याच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा सभागृहात सत्ताधारी नगरसेवक सुधीर आडीवरेकर सिद्धार्थ भांबोरे आणि विरोधी नगरसेवक तौकीर शेख यांनी मुख्याधिकारी यांना धारेवर धरले मागच्या वेळी संबंधित गाळ्यांचे सिल तोडताना सभागृहाला का सांगितले गेले नाही व आता पुन्हा एकदा संबंधित गाळे सील करण्यासंदर्भात नोटीस त्याची गरज का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान आतील सामान खराब होऊ नये म्हणून त्यांना आगाऊ नोटीस देण्यात आल्याचे मुख्याधिकारी यांनी स्पष्ट केले तर मागच्या सभेत अध्यक्षांनी संबंधित काळे सील करण्यासंदर्भात सूचना दिली असताना तुम्ही अध्यक्षांच्या सूचनांचा अपमान करता का असावा विरोधी नगरसेवक देवा टेमकर यांनी केला. दरम्यान या संदर्भात कडक पावले उचलली जातील असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
शहरात भटक्या कुत्र्यांना अन्न घालण्यासाठी जागा निश्चित केले असताना सुद्धा काही पाणीप्रेमी शहरात कुत्र्यांना कोंबड्याचे पाय न शिजवता घालत आहेत याबाबत विचारणा करायला गेलेल्या नगरसेवक तौकीर शेख यांच्यावरच एका महिलेने तक्रार केली त्यामुळे अशा पाणी प्रवीण वर फौजदारी कारवाई होणे गरजेचे आहे अशी मागणी विरोधी नगरसेवक देवा टेमकर यांनी केली यावर आता कठोर निर्णय घेतला जाईल असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले तर शहरातील गवळी तिठि ते भटवाडी रस्ता परिसरात मच्छी विक्रेते रस्त्यावर मच्छी विक्री करतात त्यामुळे त्या भागात वाहतूक कोंडी होते शिवाय परिसरात दुर्गंधी पसरते यावर पालिका प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी शहरात पालिकेचे सुंदर मच्छी मार्केट असताना उघड्यावर मच्छी विक्री करण्यास मज्जाव आणावा असे मागणी सत्ताधारी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी केली दरम्यान बऱ्याच वेळा कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना आपल्याच नगरसेवकांकडून होऊन जातो त्यामुळे ही कारवाई थांबते त्यामुळे अशा प्रकारावर कोणीच मध्यस्थी न करता सहकार्य करावे असे विनंती आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी केली. तर रस्त्यावर मच्छी विक्रेत्या करणाऱ्या मच्छी विक्रेत्यांना नोटीस कल्पना देण्यात यावी अन्यथा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी केल्या. तर मच्छी मार्केट मधील महिला विक्रेत्यांसाठी बोरवेल व टॉयलेटची सोय उपलब्ध करून द्या अशी सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली.

