Headlines

ज्येष्ठ नागरिक विकास मंचाच्या अध्यक्षपदी हनुमंत मालवणकर

बांदा पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक विकास मंचाची सन २०२६ ते २०२९ या तीन वर्षांसाठी नूतन कार्यकारिणी जाहीर

बांदा/प्रतिनिधी
बांदा पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचे प्रश्न सोडविणे, त्यांच्या अडीअडचणींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच सामाजिक, सांस्कृतिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदा पंचक्रोशीच्या सन २०२६ ते २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.
या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी हनुमंत वसंत मालवणकर यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी भिकाजी शंकर धुरी, तर उपाध्यक्षा म्हणून श्रीमती निकिता तुकाराम मोरजकर यांची निवड झाली आहे.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष – हनुमंत वसंत मालवणकर
उपाध्यक्ष – भिकाजी शंकर धुरी
उपाध्यक्षा – श्रीमती निकिता तुकाराम मोरजकर
सचिव – गुरुनाथ आत्माराम नार्वेकर
सहसचिव – उत्तम श्रीधर देसाई
खजिनदार – जगन्नाथ शांताराम सातोस्कर
नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, आरोग्य, सामाजिक सहभाग आणि त्यांच्या हक्कांसाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page