⚡वैभववाडी ता.०५-: अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न पुणे जिल्हा पत्रकार संघ व क्राईम बॉर्डर, क्राईम रिपोर्टर वेलफेअर असोसिएशन मुंबई व निर्भया पथक लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी निमित्त कंदील बनवण्याची कार्यशाळा व खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
*लोणावळा * – शाळा क्र. ६, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, गवळीवाडा, लोणावळा
सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून सुरवात करण्यात आली. जेष्ठ पत्रकार श्रीराम कुमठेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यशाळेत मुलांना आकाश कंदील शिवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
*कंदील शिवण्यासाठी विशेष मार्गदर्शन
- पुष्पी अगरवाल
- नंदिका कामत
- दिक्षिता गुप्ता
- शीतल अगरवाल
शाळेच्या विध्यार्थांनी स्वतःच्या हाताने सुंदर आकाश कंदील बनवून दाखवले. कंदील बनवताना मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य हे विशेष होते. “काहीतरी वेगळं शिकायला मिळालं” अशी आनंदी प्रतिक्रिया मुलांनी व्यक्त केली.
प्रमुख उपस्थिती:
- ज्येष्ठ पत्रकार श्रीराम कुमठेकर व माजी शिक्षिका कुमठेकर काकू
- निर्भया पथकाच्या मा. पोलीस रिया राणे
- उद्योजक अनंता पाडाळे
- इंडियन स्काऊट अँड गाईड लोणावळा गिल्डचे अध्यक्ष रत्नप्रभा गायकवाड, हेमलता शर्मा, अंबिका गायकवाड, आशिष जांगीर, श्रावणी कामत
- दक्षता कमिटी सदस्य नीता गायकवाड, कविता अडसूळे
- ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष पांडुरंग तिखे
- उद्योजक चौधरी, युवराज चौधरी
महत्त्वाचे मार्गदर्शन:
निर्भया पथकाच्या पोलीस रिया राणे यांनी मुलांना गुड टच / बॅड टच बद्दल माहिती दिली. तसेच अनोळखी व्यक्तीने खाण्यासाठी काही दिले तर ते न खाता घरी जाऊन पालकांना सांगून दाखवावे, असे सांगितले.
स्काऊटच्या लोणावळा गिल्ड च्या वतीने मुलांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या व एकट्याने फटाके वाजवू नयेत असा मोलाचा सल्ला देण्यात आला.
खाऊ वाटप:
उद्योजक चौधरी व युवराज चौधरी यांच्याकडून मुलांना लाडू वाटप करण्यात आले. तसेच लोणावळा शहर पोलीस स्टेशन, क्राईम रिपोर्टर वेलफेअर असोसिएशन व स्वर्ग संस्थेच्या वतीने मुलांना खाऊ वाटप चॉकलेट, शंकरपाळी, चिवडा, केक देऊन करण्यात आले.
कार्यशाळा घ्यायला आलेल्या मान्यवरांचे ट्रॉफी आणि सर्टिफिकीट गुलाबाचं पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले
या कार्यक्रमाला शाळेच्या शिक्षिका, पोलीस कर्मचारी, पत्रकार बांधव यांचे मोलाचे सहयोग लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा तांदळे यांनी सर्वांचे आभार मानले.
आयोजक सौ. श्रावणी धनंजय कामत – अध्यक्ष

