Headlines

अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संशयीत आरोपीला एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर…

⚡सावंतवाडी ता.०४-: अपघातात एका तरुणाचा मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याप्रकरणी निष्पन्न झालेल्या संशयित आरोपीला जिल्हा न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. आरोपी गोपाळ सुरेश गावडे (रा. चौकुळ, नेनेवाडी, ता. सावंतवाडी) असे त्याचे नाव आहे. आरोपीच्या वतीने अँड परशुराम चव्हाण व अँड. सुभाष वंजारी यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page