Headlines

“सातार्डा चेकपोस्टवर अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई…

६०० बॉक्स जप्त: दोन संशयित ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात” ..

सावंतवाडी : सावंतवाडी पोलिसांकडून सातार्डा चेक पोस्ट येथे अवैध दारू वाहतूकीवर मोठी कारवाई करण्यात आली. यात लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दारूनं भरलेले तब्बल ६०० बॉक्स ताब्यात घेण्यात आले. आज दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा चेक पोस्टवर ही कारवाई करण्यात आली. दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना सावंतवाडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. या कारवाईत अवैध दारूचे तब्बल ६०० बॉक्स असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार श्रीरंग टाकेकर, राहुल बर्गे यांनी केली. यावेळी पोलीस हर्षद हिंगे, श्री. धोत्रे, निलेश नाईक पंच शंकर साटेलकर, प्रकाश मेस्त्री आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page