⚡वेंगुर्ला ता.०३-: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जय हनुमान मित्रमंडळातर्फे शनिवार दि.७ नोव्हेंबर रोजी रात्रौ ७ वाजता जुना स्टॅण्ड, बंदर रोड, वेंगुर्ला येथे भव्य दिव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा युवा नेते विशाल परब यांनी पुरस्कृत केली आहे.
स्पर्धेतील मोठ्या गटातील प्रथत तीन विजेत्यांना अनुक्रमे १५ हजार, १२ हजार आणि १० हजार तर लहान गटातील प्रथम विजेत्यांना अनुक्रमे १० हजार, ८ हजार आणि ६ हजार अशी पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत ट्रिकसीनयुक्त नरकासूर ग्राह्य धरले जाणार नाहीत. स्पर्धेच्या ठिकाणी नरकासुर घेऊन येताना दाभोली नाका मार्गे घेऊन यावे आणि जाताना कलानगर शिरोडा नाका मार्गाने जावे. स्पर्धेचे परिक्षण १० ते ११ या वेळेत होईल. रात्रौ १० नंतर येणारे नरकासूर स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. स्पर्धेच्या ठिकाणी येताना शाळा नं.२ कडून डिजे बंद करणे अनिवार्य आहे. स्पर्धेचा निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येईल.

