Headlines

सावंतवाडीत अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानची ओपीडी सुरू…

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन:दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांना यश..

⚡सावंतवाडी ता.०५-: अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा (आयुष मंत्रालय, भारत सरकार) यांच्या बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) चे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. सावंतवाडी नगरपरिषदेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील पहिल्या मजल्यावर ही ओपीडी सुरू झाली आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रूग्णांना आयुष मंत्रालयाकडून मिळणारे उपचार आता सावंतवाडीतच उपलब्ध होणार आहेत. यासाठी माजी मंत्री, आमदार दीपक यांनी विशेष परिश्रम घेतले.

मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या नवीन एक्स्टेंशन ओपीडीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोव्याचे संचालक प्रा. (वैद्य) पी. के. प्रजापती, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, रूग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी देव्या सुर्याजी, मुख्याधिकारी विनायक औंधकर आदी उपस्थित होते.

या निमित्ताने अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा व राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्यावतीने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचाही शुभारंभ यावेळी करण्यात आला. शिबिरासह येत्या काळात नागरिकांना मोफत आरोग्य सेवा इथं मिळणार आहेत. या शिबिराचा लाभ शेकडो रुग्णांनी घेतला. याप्रसंगी डॉ. विनायक चकोर, डॉ. स्वाती गायकवाड, डॉ. प्रशांत ससाणे, डॉ. दीपक ए. एस., डॉ. दत्तात्रय पवार, महिला सभापती दिपाली भालेकर, शिवसेना शहरप्रमुख बाबु कुडतरकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, देवा टेमकर, आनंद शिरवलकर, आयुष स्टाफ नर्स पूजा जोळंबेकर, स्वप्नील खावडकर, फार्मासिस्ट दर्शन सावंत, फिजिओथेरपीस्ट गौरव कुडाळकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page