संजू परब यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट; आमदार दीपक केसरकरही उपस्थित..

⚡सावंतवाडी ता.०५-: राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार नीलेश राणे यांचे आज सावंतवाडीत आगमन झाले. यावेळी त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीप्रसंगी आमदार दीपक केसरकर हेदेखील उपस्थित होते.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्योगमंत्री उदय सामंत सावंतवाडीत आले होते. यावेळी त्यांनी संजू परब यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्याशी संवाद साधला. या प्रसंगी आमदार नीलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीमुळे या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.या सदिच्छा भेटीदरम्यान स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती.
