श्री. दिलीप गिरप ; उत्कृष्ट सेवेबद्दल वरिष्ठ लिपिक निशा आळवे- कुबल यांचा सत्कार
वेंगुर्ला
वेंगुर्ला नगरपरिषद कार्यक्षेत्रात भुयारी गटार योजना विकेंद्रीकरणासाठी
(विकेंद्रित सांडपाणी प्रक्रिया युनिट ) शासनामार्फत 8 कोटी रुपये निधी मंजूर झाला असून शहरात छोटे-छोटे एसटीपी प्लांट करण्यात येणार आहेत. याबाबत म्हाडा मधील ओपन स्पेस, रेडकर खानावळनजीक, राऊळवाडा आंबेखण नजीक, मांडवी रस्ता नजीक व आनंदवाडी इत्यादी प्रस्तावित जागा ठिकाणी एसटीपी प्लांटसाठी चर्चा करण्यात आली. याबाबत प्रशासनाने पाठपुरावा करावा, असे नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी न. प. सर्वसाधारण सभेत सुचित केले. दरम्यान शहरातील नगरपरिषद मालकीच्या जागांचा तातडीने सर्व्हे करण्याचे आदेश नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी संबंधित विभागाना दिले. वेंगुर्ला नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, प्रभारी मुख्याधिकारी संकेत गायकवाड, बांधकाम समिती सभापती प्रणव वायंगणकर, महिला व बालकल्याण समिती सभापती गौरी पाटील, उपसभापती रिया केरकर, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती गौरी माईंणकर, समाजकल्याण समिती सभापती युवराज जाधव, नगरसेवक प्रीतम सावंत, सुधीर पालयेकर, रवींद्र शिरसाट, दाजी परब, प्रशांत आपटे, विनय नेरुरकर, तसेच नगरसेविका आकांक्षा परब, सुषमा प्रभूखानोलकर, शितल आंगचेकर, लीना म्हापणकर, समिधा रेडकर, काजल कुबल तसेच प्रशासकीय अधिकारी अभिजीत पाटील, अन्य खात्याचे अधिकारी उपस्थित होते. वेंगुर्ला कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह नजीक असलेले कॅन्टीन बचतगटाला चालविण्यात देण्यात आले असून मासिक भाडे 3 हजार रुपये व विद्युतबिल या तत्त्वावर देण्यात आले आहे. याबाबत त्यावेळी प्रशासनाने ठराव घेतला आहे. तसेच त्यावेळी सिंधूरत्न मंजूर दहा लाख रुपयांचे साहित्य देण्यात आले आहे. दरम्यान संबंधितचे 72 हजार रुपये भाडे येणे आहे. याबाबत सभागृहात विस्तृत चर्चा करण्यात आली. याबाबत बचतगट मीटिंग घेऊन चर्चा करून निर्णय घेण्यात यावा, असे नगराध्यक्ष यांनी सूचित केले. वेंगुर्ला मच्छीमार्केट विस्तारीकरण शासनामार्फत सर्वप्रथम उपलब्ध होणाऱ्या निधीतून करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. शासनामार्फत आपत्ती व्यवस्थापन मार्फत मिळणाऱ्या निधीतून नालेजोड प्रकल्प अंतर्गत वेशी भटवाडी पासून मानसीश्वर पर्यंत जाणाऱ्या नाल्यांवर बंधारा बांधण्याचे निश्चित करण्यात आले. मागील टर्म मध्ये श्री देव रामेश्वर मंदिर नजीक एसटीपीचे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्याबाबत चर्चा करून उर्वरित काम पूर्ण करण्याबाबत ठरविण्यात येईल, असे नगराध्यक्ष यांनी सूचित केले. मानसी गार्डन ते मांडवी पर्यंत सायकलिंग वॉकिंग ट्रॅक ला सीआरझेडची परवानगी मिळणार नसल्याने हा प्रोजेक्ट न करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान अंतर्गत पन्नास टक्के निधीतून महिलांसाठी आरोग्य सुविधा बाबत काम सुरू आहे. तर पर्यटन विकास साठी सिंधूरत्न मधील निधी निर्माण करण्यासाठी विचारविनिमय करून निश्चिती करण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले. शहरात विकसित करण्यात आलेल्या विद्युत स्ट्रीप नियमित सुरू करण्याबाबत नियोजन करा, अशा सूचना नगराध्यक्ष यांनी अभिजीत गिरप यांना दिल्या.7 ते 9 या वेळेत या स्ट्रीप सुरू ठेवण्यात याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. सध्या न. प. मालमत्तांचे पूर्व मूल्यांकन सुरू आहे, याबाबत सुषमा प्रभूखानोलकर यांनी प्रश्न उपस्थित केला. दरम्यान 24 फेब्रुवारी रोजी याबाबत सर्वसाधारण सभेत चतुर्थ वार्षिक कर आकारणी बाबत ठराव घेण्यात आला असून सर्व्हे करण्यात येत आहे, त्याबाबत सूचना मांडा, त्या सोडविण्यात येतील, असे नगराध्यक्ष श्री. गिरप यांनी उपस्थित नगरसेवकांना सूचित केले.
यावेळी आश्वासित प्रगती योजना बाबत वरिष्ठ लिपिक निशा आळवे कुबल यांनी माहिती दिली. यावेळी वेंगुर्ला नगरपरिषदेत वरिष्ठ लिपिक म्हणून चांगली सेवा देणाऱ्या निशा दिगंबर आळवे (कुबल) यांचा नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष व सभापती यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
