मालवण (प्रतिनिधी)
वाढते वय, बदलती जीवनशैली आणि शरीरातील कॅल्शियमची कमतरता यामुळे हाडांची घनता कमी होण्याचा धोका वाढतो. हाडे कमकुवत होऊन ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्या उद्भवू नयेत, यासाठी योग्य वेळी तपासणी करणे महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने लिमये हॉस्पिटल, मालवण आणि रोटरी क्लब, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हाडांची खनिज घनता (Bone Mineral Density – BMD) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मंगळवार ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लिमये हॉस्पिटल, भरड, मालवण येथे होणार आहे.
या शिबिरात ४० वर्षांवरील सर्व महिला तसेच ६० वर्षांवरील सर्व पुरुषांनी आवर्जून BMD तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. BMD तपासणीद्वारे हाडांची घनता मोजता येते आणि ऑस्टिओपोरोसिसचा संभाव्य धोका वेळेत लक्षात येण्यास मदत होते. ही तपासणी साधारणपणे अवघ्या दोन मिनिटांत, वेदनारहित आणि सुरक्षित पद्धतीने केली जाते. या शिबिराचा लाभ घ्यावा
या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
