देवगड जामसंडे न.प.निवडणूक ४जागाकरिता १३ उमेदवारी अर्ज दाखल

भाजप आणि महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन

*⚡देवगड ता.०३-:* देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या १८ जानेवारी रोजी होणाऱ्या उर्वरित ४ प्रभागांमधून एकूण १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.उमेदवारी दाखल करण्यासाठी भारतीय जनता पार्टी तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शक्ती प्रदर्शन करीत भाजप च्या वतीने चार प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल केले तर महाविकास आघाडीतील शिवसेनेचे वतीने तीन प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल केले

व काँग्रेसच्या वतीने महाविकास आघाडीत एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.या बरोबरच अपक्षांनी पाच अर्ज दाखल देले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी एकूण १३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी देवेंद्र तामोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली.या वेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील,न.प.मुख्यधिकारी कौस्तुभ गव्हाणे उपस्थित होते.देवगड तहसीलदार कार्यालयात भाजप आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केले. या उमेदवारीत देवगड जामसंडे न.प.चे माजी नगराध्यक्ष चांदोस्कर प्रकाश प्रकाश यांनी प्रभाग क्र.७ मधून भाजप कडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे .त्यांचे समोर महाविकास आघाडी मार्फत शिवसेनेने खेडेकर रोहन विश्वनाथ यानी आव्हान उभे केले आहे.तसेच या प्रभागात अन्य तीन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.प्रभाग क्र.८ मध्ये महाविकास आघाडीने शिवसेना शहरप्रमुख तारी संतोष रवींद्र यांना उमेदवारी दाखल करून त्यांचे समोर भाजपने हा मतदार संघ सर्वसाधारण असतानाही यापूर्वी नामप्र मधून घोषित केलेल्या पारकर निधी नयन यांची उमेदवारी कायम ठेवली असल्याने विशेष लढत या प्रभागात पहावयास मिळणार आहे.या प्रभागातही २ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी,भाजपच्या वतीने माजी आमदार अजित गोगटे,जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम,माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर,प्रणाली माने,तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर सरचिटणीस शरद ठुकरुल,,जिल्हा बँक संचालक प्रकाश बोडस माजी उपनगराध्यक्ष उमेश कणरेकर,राजेंद्र वालकर योगेश पाटकर ,सुरेश धुरी अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.शिवसेनेच्या वतीने निरीक्षक संदेश पारकर,तालुका प्रमुख विलास साळसकर,मिलिंद साटम ,उपतालुका प्रमुख निवृत्ती उर्फ बुवा तारी माजी सभापती रवींद्र जोगल,माजी नगरसेविका हर्षा ठाकूर,माजी प.स.सदस्य सुनील तिरलोटकर, अमोल लोके,संजय वाळके,जेष्ठ शिवसैनिक दादा पडेलकर, महिला आघाडी प्रमुख स्वप्नाली वाल्मीकी उपस्थित होते.काँग्रेस पक्षाच्या वतीने निरीक्षक बाळू अंधारी,तालुका अध्यक्ष उल्हास मणचेकर,जिल्हा कार्यकारणी सदस्य सुरेश देवगडकर उपस्थित होते. देवगड जामसंडे न.प.निवडणुकीत प्रभाग क्रमांक ०४, सर्वसाधारण महिला -१)घाडी मनीषा अनिल , २)भडसाळे मृणाली महेश, प्रभाग क्रमांक ०५,सर्वसाधारण महिला- १)कुळकर्णी सुजाता उमेश , २)जामसंडेकर ,मनीषा अनिल, प्रभाग क्रमांक ०७ सर्वसाधारण यात १)खेडेकर रोहन विश्वनाथ , २)चांदोस्कर योगेश प्रकाश३),कणेरकर प्रफुल्ल भिकाजी, ४)कुळकर्णी सौरभ सुर्यकांत,५)मेस्त्री राजेंद्र बाळकृष्ण प्रभाग क्रमांक ०८सर्वसाधारण यामधून १)तारी संतोष रवींद्र ,२) पारकर निधी नयन,३)नाडणकर प्रणव चंद्रकांत,४) केळकर वैभव मिलिंद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत . प्रभाग क्र ७ मधून सर्वाधिक ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर त्या खालोखाल प्रभाग क्र ८ मधून ४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नामनिर्देशन पत्र छाननी मंगळवार दि.४ जानेवारी रोजी होणार आहे.

You cannot copy content of this page