वैभववाडी प्रतिनिधी शाळा दत्त विद्यामंदिर वैभववाडी नंबर 1मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणजेच “बालिकादिन” साजरा करण्यात आला.या दिनाप्रीत्यर्थ सावित्रीबाई फुलेंच्या वेशभूषा सादर करण्यात आली.
शाळेत आज विद्यार्थ्यानी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेणारी भाषणे केली. सावित्रीबाई फुलेंच्या जयंती कार्यक्रमाला सामाजिक केंद्र प्रमुख जाधव सर ,सौ दिप्ती पाटील मॅडम,सौ सावंत मॅडम,सौ सरकटे मॅडम, पारधे सर , अंगणवाडी सेविका सौ निकम मॅडम,पालक विद्यार्थी मोठे संख्येने उपस्थित होते.