Headlines

तळेरे सोसायटी निवडणुकीत भाजपा पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे वर्चस्व

*⚡कणकवली ता.०३-:* तळेरे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी च्या१०५वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच लागलेल्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत परिवर्तन पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत. तर विरोधी गटाच्या सहकार पॅनलला खातेही उघडता आले नाही. तळेरे सोसायटी निवडणुकीत महिलांसाठी असलेल्या २ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या.उर्वरित ११ जागांसाठी भाजपा पुरस्कृत परिवर्तन पॅनेल विरुद्ध सर्व पक्षांचे मिळून पक्ष विरहित सहकार पॅनल यांच्यात लढत झाली. मतमोजणीत भाजपा पुरस्कृत परिवर्तन १० उमेदवार व परिवर्तन पॅनल पुरस्कृत पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले निलेश तळेकर निवडून आले.असे १३ ही उमेदवार एक हाती निवडून आणण्याचा चमत्कार पॅनल प्रमुख व कणकवली प.स.चे माजी सभापती दिलीप तळेकर यांनी केला आहे.

निवडणूक निकाल:सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी विजयी ८ उमेदवार पुढील प्रमाणे-१)दिलीप चिमाजी तळेकर(२७० मते)२)अनिल गणपत मेस्त्री -२६२ मते,३)सुधाकर मधुकर राणे- २५८ मते,४)अशोक शांताराम तळेकर-२४९मते, ५)प्रमोद नारायण तळेकर-२४८,६)अनंत उमाजी राणे-२४४मते, ७)प्रदिप जनार्दन तळेकर-२४२मते सर्व विजयी उमेदवार (भाजपा पुरस्कृत परिवर्तन पॅनल) ,८)निलेश अरविंद तळेकर- (अपक्ष) -१३५ मते विजयी उमेदवार अनुसूचि जाती जमाती प्रतिनिधी: दिनेश भिवा कांबळे (परिवर्तन पॅनल)-२६४मते-विजयी, अरुण दाजी कांबळे (सहकार पॅनल)-११२ मते पराभुत ,भटक्या विमुक्त,/ जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग:बिरु खंडू पटकारे (परिवर्तन पॅनल)-२६३ मते विजयी,गणपत बाबू पटकारे(सहकार पॅनल) -११६ मते पराभूत , इतर मागास वर्ग प्रतिनिधी-विजय सुरेश मेस्त्री (परिवर्तन पॅनल)-२६५मते- विजयी, संतोष श्रीधर जठार (सहकार पॅनल)-१२१ मते पराभुत महिलांसाठी राखीव मतदारसंघ -बिनविरोध निवडून दिलेले उमेदवार-श्रीम.सुषमा विजय बांदिवडेकर (तळेरे खंडवाडी),व श्रीम.रंजना राजाराम गुरव (गुरववाडी साळिस्ते) दोन्हीही परिवर्तन पॅनल ही विजयश्री खेचून आणण्यासाठी पॅनलचे प्रतिनिधी राजेश जाधव,उल्हास कल्याणकर,राजेश माळवदे,दिपक नांदलस्कर,मनोज तळेकर,किशोर खाडये, तसेच शैलेश सूर्वे ,सुयोग तळेकर,चिन्मय तळेकर,बली तळेकर,अनुप तळेकर, सिद्धेश तळेकर, अभिष्ट नांदलस्कर,रोहित तळेकर,अमेय खटावकर, तेजस तळेकर यांच्यासह साळिस्ते,दारुम,ओझरम व तळेरे गावातील अनेक कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत आनंद व्यक्त केला.

You cannot copy content of this page