*⚡मालवण ता.०३-:* मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रा.के के राबते.यांनी सूत्रसंचालन केले. तर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सामंत यांनी मनोगत व्यक्त करत सावित्रीबाईंच्या कार्याचा आढावा घेतला. आभार प्रदर्शन प्रा. मिलन सामंत यांनी केले. त्यावेळी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विध्यार्थी उपस्थित होते.