Headlines

वायरमन कै.आनंद मिराशी यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर

आमदार वैभव नाईक यांचा पाठपुरावा : मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निधी केला वर्ग ⚡मालवण ता.०७-: विजेचा धक्का लागून अपघाती मृत्यू झालेले महावितरण कंपनीचे आचरा येथील कंत्राटी वायरमन आनंद कृष्णा मिराशी यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून १ लाख रु.चे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. आम. वैभव नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री…

Read More

सुनील राऊळ यांच्यामुळे माजी सैनिक पतसंस्थेला मिळाली उंची

पी एफ डॉन्टस ⚡सावंतवाडी ता.०७-: जिल्ह्यातील माजी सैनिकांचे मानबिंदू असणाऱ्या सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेला आर्थिक दृष्ट्या वेगळ्या उंची वर नेवून ठेवण्याचे व जनमानसात या पतसंस्थेबद्दल विश्वास निर्माण करण्याचे काम सुनिल राऊळ यांनी केले आहे. त्यांना मिळालेल्या दै. सकाळ व साम टिव्ही आयडॉल ऑफ महाराष्ट्र हा मानाचा पुरस्कार त्याचे प्रतिक आहे असे गौरद्गार सैनिक पतसंस्थेचे संस्थापक…

Read More

सिंधुदुर्ग महाविद्यालयात ८ रोजी रक्तदान शिबिर

⚡मालवण ता.०७-: मालवण येथील स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या वतीने (राष्ट्रीय छात्र सेना ५८महाराष्ट्र बटालियन व एन एस एस यांच्या संयुक्त विद्यमानाने) दि. ८ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये रोटरी क्लब मालवण व लायन्स क्लब मालवण यांचाही सहभाग असणार आहे. या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होऊन…

Read More

आ केसरकर यांची तातडीची मदत

झाड पडून नुकसान झालेल्या निगुडेतील नाईक यांना दिल्या ताडपत्र्या ⚡सावंतवाडी ता.०७-: निगुडे येथील तेलीवाडी येथे कृष्णा नाईक यांच्या घरावर झाड कोसळून छपराचे नुकसान झाल्याचे समजतात सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी ताबडतोब दोन ताडपत्रींची मदत केली ऐन जोरदार कोसळणाऱ्या पावसात ताडपत्री स्वरूपात केलेल्या मदतीचे नाईक कुटुंबीयांनी आभार मानले आहेत. तर केसरकर यांनी तहसीलदार यांना दूरध्वनीवरून संपर्क…

Read More

धरण परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-: जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे हे प्रकल्प येत्या एक ते दोन दिवसात पूर्ण क्षमतेने भरून पाणी धरणाच्या सांडव्यावरून ओसंडून वाहणार आहे. अशावेळी धरण परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे व सांडव्याच्या तसेच धरण क्षेत्रामध्ये जाऊ नये असे आवाहन सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग, अंबडपालचे कार्यकारी अभियंता…

Read More

आम्ही थेट उद्धव ठाकरेंशी बोलू;

आजुबाजूचे लोक त्यांनी बाहेर ठेवावे; दीपक केसरकरांचं मोठं विधान ⚡मुंबई दि.०७-: शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलवल्यास आम्ही नक्की जाऊ, असं मोठं विधान दीपक केसरकर यांनी केलं आहे. आम्ही थेट उद्धव ठाकरेंशी बोलू. मात्र आजुबाजूचे लोक त्यांनी बाहेर ठेवावे. तसेच आता आम्ही भाजपासह असल्यामुळे त्यांच्यासोबतही संवाद साधावा लागेल, असं दीपक केसरकर यांनी…

Read More

चिरे खाणीतील माती वाहून बागायतीत आल्याने बागायतीचे नुकसान…

⚡सावंतवाडी ता.०७-: मळेवाड सावळवाडी येथील गोविंद महादेव सावळे यांच्या बागायतीत चिरे खाणीतील माती वाहून आल्याने नुकसान झाले आहे.मळेवाड सावळवाडी येथील गोविंद महादेव सावळ यांची माड बागायत व सुपारी ची बाग आहे .त्याचप्रमाणे मिरी लागवड व इतर आंतर पिके घेतली आहेत. या बागेच्या वरच्या बाजूला फार मोठ्या प्रमाणात चिरे खाणींचा व्यवसाय चालतो.गेले दोन दिवस जोरदार अतिवृष्टी…

Read More

साने गुरुजी वाचन मंदिरात ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ कार्यक्रम संपन्न

⚡मालवण ता.०७-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिरतर्फे आषाढस्य प्रथम दिवसे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त टोपीवाला हायस्कूलचे शिक्षक महेश धामापूरकर यांचे महाकवी कालिदास यांच्यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी साने गुरुजी यांच्या प्रतिमेला महेश धामापूरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली. संस्थेतर्फे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांच्या…

Read More

पावसाळ्यासाठी मालवण न.प. कडून आपत्कालीन व्यवस्थापन पथके गठीत

⚡मालवण ता.०७-: मालवण शहरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिकेने आपत्कालीन व्यवस्थापन उपाययोजना जाहीर केली असून शहरातील विभागानुसार आपत्कालीन व्यवस्थापन पथके नेमण्यात आली आहेत. पावसादरम्यान शहरात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत उपाययोजनेसाठी नागरिकांनी नगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन क्रमांकावर तसेच पथकातील व्यक्तींशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले आहे. पावसाळ्यात मालवण शहरातील कोणाच्या घरात पाणी शिरले किंवा…

Read More

खैदा येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी उत्सव

⚡मालवण ता.०७-: मालवण तालुक्यातील खैदा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी उत्सव रविवार दि.१० जुलै रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी ७.३० वा.पासून दीड प्रहरचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होणार असून श्री विठ्ठल रखुमाई पदस्पर्श दर्शन व ओटी भरण्याचे कार्यक्रम होतील. तरी सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खैदा ग्रामस्थ मंडळातर्फे करण्यात आले…

Read More
You cannot copy content of this page