⚡मालवण ता.०७-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिरतर्फे आषाढस्य प्रथम दिवसे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त टोपीवाला हायस्कूलचे शिक्षक महेश धामापूरकर यांचे महाकवी कालिदास यांच्यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
प्रारंभी साने गुरुजी यांच्या प्रतिमेला महेश धामापूरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली. संस्थेतर्फे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन श्री. धामापूरकर यांचे स्वागत करण्यात आले. सौ. ज्योती तोरसकर यांना संस्थेचे कोषाध्यक्ष रुजारिओ पिंटो यांच्या हस्ते ग्रंथ भेट देण्यात आला. कार्यक्रमाला टोपीवाला हायस्कूलचा नववी अ चा वर्ग उपस्थित होता.
लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी सेवांगणच्या उपक्रमांची माहिती दिली. कवी कालिदासांचे जीवन चरित्र धामापूरकर यांनी उलगडले. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांना पाच प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली. सर्वोत्कृष्ट प्रश्नाची निवड ज्योती तोरसकर यांनी केली. आर्यन प्रभूगावकर याचा प्रश्न सर्वोत्कृष्ट ठरला, विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे महेश धामापूरकर यांनी दिली. मुलांना साधना दिवाळी अंक भेट देण्यात आला. साने गुरुजी वाचन मंदिरच्या ग्रंथपाल ऋतुजा केळकर यांनी ग्रंथालयाची माहिती दिली तसेच वाचनालयाचे वाचक, सभासद होण्याचे मुलांना आवाहन केले.
या कार्यक्रमाला स्नेहा साटलकर, संजय आचरेकर, रुचिरा चिंदरकर, अक्षय सातार्डेकर, चारुशीला देऊलकर, मनोजकुमार गिरकर, विजय कुडाळकर, अदिती कुडाळकर, धर्माजी कांबळी, भालचंद्र मळेकर, बागवे, सौ. कदम, पूनम भुर्के, तेजस्विनी पाताडे उपस्थित होते. कार्यक्रमाची व्यवस्था संजयकुमार रोगे आणि सोनाली कांबळी यांनी पाहिली. आभार संजयकुमार रोगे यांनी मानले.
