Headlines

आमदार निलेश राणे जनसंपर्क कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली

मालवण (प्रतिनिधी)

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मालवण येथील आमदार निलेश राणे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात करण्यात आली. यावेळी बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देत अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहरप्रमुख राजू बिडये, नगरसेवक महेश कांदळगावकर, सिद्धार्थ जाधव, नगरसेविका मेघा सावंत, अभय कदम, शिवाजी केळूसकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page