Headlines

वेंगुर्ला शिवसेनेतर्फे बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी साजरी…

⚡वेंगुर्ला ता.१७-: बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून शिवसैनिक घडवण्याबरोबरच सामाजिक राजकीय क्षेत्रात प्रभावी कार्य केले आहे. त्यामुळे आज अगदी ग्रामीण स्तरावर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. त्यामुळे बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना तालुक्यात अधिक प्रभावीपणे वाढवायची आहे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी वेंगुर्ला येथे बोलताना केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त मंगळवारी शिवसेना कार्यालयात प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. तसेच आगामी कालावधीत अधिक प्रभावीपणे सर्वांना विश्वासात घेऊन जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी जिल्हा संघटक सुनील डुबळे, शहरप्रमुख अजित राऊळ, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, विभागप्रमुख मितेश परब, संजय परब व शैलेश नार्वेकर, तसेच प्रतीक खानोलकर, सत्यवान साटेलकर, प्रथमेश सावंत, उमेश आरोलकर, स्वप्निल हाऊस्मनी, पंकज शिरसाट, महिला आघाडीच्या सातार्डेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page