मालवण (प्रतिनिधी)

“अमर रहे, अमर रहे बाळासाहेब ठाकरे अमर रहे, एकच साहेब एकच बाळासाहेब, बाळासाहेब”… अशा घोषणा देत आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण शाखेत बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक तथा माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, उमेश मांजरेकर, नंदू गवंडी यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना तालुका समन्वयक तथा नगरसेवक मंदार ओरसकर, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, उपशहरप्रमुख किरण चव्हाण, शाखाप्रमुख किशोर गावकर, बंड्या सरमळकर, पॉली गिरकर, गणेश चव्हाण, सिद्धेश मांजरेकर, विशाल सरमळकर, सुरेश माडये, बबन वाघ उपस्थित होते.
