पावसाळ्यासाठी मालवण न.प. कडून आपत्कालीन व्यवस्थापन पथके गठीत

⚡मालवण ता.०७-: मालवण शहरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिकेने आपत्कालीन व्यवस्थापन उपाययोजना जाहीर केली असून शहरातील विभागानुसार आपत्कालीन व्यवस्थापन पथके नेमण्यात आली आहेत. पावसादरम्यान शहरात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत उपाययोजनेसाठी नागरिकांनी नगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन क्रमांकावर तसेच पथकातील व्यक्तींशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले आहे.

पावसाळ्यात मालवण शहरातील कोणाच्या घरात पाणी शिरले किंवा शॉर्टसर्किट सारखा कुठलाही प्रकार नागरिकांच्या विभागात घडला असेल किंवा नागरिक पावसाच्या पाण्यामुळे कुठे अडकून पडले असतील तर आपत्कालीन व्यवस्थापन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच घराचे छत पत्रे उडाले असतील, घरात पाणी शिरले असेल तर सर्व प्रथम इलेक्ट्रिसिटी मेन स्विच बंद करावा, जेणेकरून नागरिक आपला जीव व इतरांचाही जीव वाचवू शकतात, असे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी म्हटले आहे.

मालवण नगरपालिकेने निर्माण केलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन उपाययोजनेत शहरातील विविध भागांनुसार पथके गठीत करून त्यांचे संपर्क क्रमांक जारी करण्यात आले आहे. यामध्ये मालवण आपत्कालीन व्यवस्थापन कंट्रोल रूम- 02365- 252030, टोल फ्री क्र.- -18002334381, पोलीस- १००, मालवण आपत्कालीन व्यवस्थापन पथक:- देऊळवाडा, आडवण, आडारी –निखिल नाईक, रमेश कोकरे , सुधीर आचरेकर- 9404307939 , 8459058543, मेढा , राजकोट- मंदार केळूसकर, सुमेध जाधव, बाळा जाधव- 9373986355, 9307625416, धुरीवाडा, रेवतळे – प्रणव घोरपडे, मिथुन शिगले, सागर जाधव- 8605171010 , 8329362883, एसटी स्टँड, गवंडीवाडा, बाजारपेठ- आनंद वळंजू, भारत जाधव, भूषण जाधव- 9403557341, 9404817113, दांडी , वायरी- प्रसाद भुते, सुमित हसोळकर ,कृष्णा कांबळे 8888391426, 7720979970 यांच्याशी त्या त्या भागातील नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page