Headlines

जावेद खतीब यांच्याकडून अंगणवाडीसाठी आवश्यक साहित्याचे वितरण…

⚡बांदा, ता.१७-: बांदा ग्रामपंचायतीचे प्रभाग क्रमांक २ चे क्रियाशील सदस्य तथा माजी उपसरपंच जावेद खतीब यांनी सामाजिक बांधिलकी जपत उभा बाजार, आळवार्ड, मोर्येवाडी येथील अंगणवाडीसाठी स्वखर्चातून आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले.

यामध्ये अंगणवाडीच्या शौचालयासाठी नवीन दरवाजा बसवून देण्यात आला. तसेच अंगणवाडी सेविका सावंत मॅडम यांच्याकडे चार पायपुसण्या, दोन चटया आणि लाईटचे बल्ब सुपूर्द करण्यात आले.
यावेळी यतीन धामापूरकर, प्रवीण नाटेकर, सुरज धामापूरकर, सुनील धामापूरकर, ऋषी हरमलकर, मंदार धामापूरकर, आप्पा धामापूरकर तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवरांनी जावेद खतीब यांचे मनःपूर्वक आभार मानत त्यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक केले.

You cannot copy content of this page