नियुक्तीनंतर संदीप साटम यांनी घेतले खासदार नारायण राणे अन् मंत्री नितेश राणेंचे आशीर्वाद
⚡कणकवली ता.१५-: महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ अंतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघ संघातून सह-अध्यक्षपदी भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि देवगड-शिरगावचे सुपुत्र संदीप साटम यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच राज्यातील ९१ विधानसभा मतदारसंघांमधील सह-अध्यक्षांची घोषणा केली, ज्यामध्ये संदीप साटम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
केंद्रीय माजी मंत्री व खासदार नारायण राणे आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्या विशेष शिफारसीवरून संदीप साटम यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीनंतर संदीप साटम यांनी तातडीने खासदार नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे आभार मानले व त्यांचे आशीर्वाद घेतले. संदीप साटम यांचे कणकवली विधानसभा मतदारसंघात संघटन कौशल्य, पक्षाप्रती असलेले योगदान आणि जिल्हा सरचिटणीस पदावरील त्यांची कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे
