झाड पडून नुकसान झालेल्या निगुडेतील नाईक यांना दिल्या ताडपत्र्या
⚡सावंतवाडी ता.०७-: निगुडे येथील तेलीवाडी येथे कृष्णा नाईक यांच्या घरावर झाड कोसळून छपराचे नुकसान झाल्याचे समजतात सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी ताबडतोब दोन ताडपत्रींची मदत केली ऐन जोरदार कोसळणाऱ्या पावसात ताडपत्री स्वरूपात केलेल्या मदतीचे नाईक कुटुंबीयांनी आभार मानले आहेत.
तर केसरकर यांनी तहसीलदार यांना दूरध्वनीवरून संपर्क सादत त्वरित नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक मदत करण्याची सूचना केली
यावेळी ही मदत देताना श्री. अशोक दळवी, श्री. गजानन नाटेकर, श्री. नारायण राणे, श्री. हळदणकर उपस्थित होते.
