सिंधुदुर्ग महाविद्यालयात ८ रोजी रक्तदान शिबिर

⚡मालवण ता.०७-: मालवण येथील स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या वतीने (राष्ट्रीय छात्र सेना ५८महाराष्ट्र बटालियन व एन एस एस यांच्या संयुक्त विद्यमानाने) दि. ८ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

यामध्ये रोटरी क्लब मालवण व लायन्स क्लब मालवण यांचाही सहभाग असणार आहे. या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, अधिक माहितीसाठी ८७६६८४४२४४ व ८७६७५८६२६९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्या डॉ. उज्वला सामंत, असोसिएट एन.सी.सी. ऑफिसर लेफ्टनंट प्रा डॉ. एम. आर. खोत, एन.एस.एस. प्रोग्रॅम ऑफिसर प्रा. शंकर खोबरे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page