सुनील राऊळ यांच्यामुळे माजी सैनिक पतसंस्थेला मिळाली उंची

पी एफ डॉन्टस

⚡सावंतवाडी ता.०७-: जिल्ह्यातील माजी सैनिकांचे मानबिंदू असणाऱ्या सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेला आर्थिक दृष्ट्या वेगळ्या उंची वर नेवून ठेवण्याचे व जनमानसात या पतसंस्थेबद्दल विश्वास निर्माण करण्याचे काम सुनिल राऊळ यांनी केले आहे. त्यांना मिळालेल्या दै. सकाळ व साम टिव्ही आयडॉल ऑफ महाराष्ट्र हा मानाचा पुरस्कार त्याचे प्रतिक आहे असे गौरद्गार सैनिक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सैनिक संघटनेचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष पी. एफ. डॉन्टस यांनी काढले.

इंडियन एक्स सर्व्हिसेस लिग, शाखा सिंधुदुर्गच्या वतीने नुकतीच सावंतवाडी येथे माजी सैनिकाची सभा झाली. यावेळी सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनिल राऊळ यांचा संघटनेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सैनिक पतसंस्थेचे चेअरमन श्री शिवराम जोशी, व्हाईस चेअरमन श्री. हिंदबाळ केळूस्कर, संचालक श्री. सुभाष सावंत, श्री. बाबुराव कविटकर, श्री. दिनानाथ सावंत, श्री. शिवाजी परब, श्री. राजाराम वळंजू, श्री. शशिकांत गावडे, श्री. दिपक राऊळ, श्री. बाळकृष्ण गावडे, श्री. दिपक शेटये, श्री. कृष्णा परब, श्री. विक्टर पिंटो, श्री. भिवा गावडे, श्री. चंद्रशेखर जोशी, श्री. शशिकांत मोरजकर, श्री. भास्कर कोचरेकर, श्री. लक्ष्मण राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page