Headlines

मालवण लायन्स क्लबमधून पहिली महिला झोन चेअरपर्सन म्हणून अनुष्का चव्हाण यांची निवड

मालवण (प्रतिनिधी)

लायन्स क्लबच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लायन्स क्लब मालवणच्या माजी अध्यक्षा सौ. अनुष्का अवधुत चव्हाण यांची लायन्स क्लबच्या झोन चेअरपर्सन पदावर निवड करण्यात आली आहे. मालवण लायन्स क्लब मधून पहिल्यांदाच महिला म्हणून हा मान मिळविण्याचा बहुमान लायन अनुष्का चव्हाण यांना प्राप्त झाला आहे.

मालवण लायन्स क्लबच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात सौ. अनुष्का चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली टीमने एकूण १०३ सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केले असून, झोन, रिजन व डिस्ट्रिक्ट स्तरावरून वैयक्तिक तसेच क्लब ला सुमारे २० पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या कालावधीत ग्रामीण भागात जाऊन दंत व नेत्र चिकित्सा शिबिरे आयोजित करण्यात आली. तसेच आचरा-वायंगणी येथे बस पीक शेडसारखा कायमस्वरूपी प्रकल्प राबविण्यात आला. मालवण ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या सोयीसाठी बेंच व खुर्च्यांचे वाटप करण्यात आले. याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध अनाथाश्रमांमध्ये अन्नदानाचे उपक्रम राबविण्यात आले. वेगवेगळ्या शाळेतील मुलांना गरजेनुसार शैक्षणिक साहित्य वाटप ही करण्यात आले.
लायन अनुष्का चव्हाण यांनी कुडाळकर हायस्कूल च्या एका गरजू विद्यार्थिनी चे शैक्षणिक पालकत्व देखील घेतले आहे.

या उल्लेखनीय कार्याची दखल घेत डिस्ट्रिक्टकडून सौ. चव्हाण यांची झोन चेअरपर्सन म्हणून २०२६-२७ या वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. या पदाअंतर्गत मालवण, कुडाळ, सावंतवाडी सावंतवाडी रॉयल व कणकवली या सिंधुदुर्गातील लायन्स क्लबचे नेतृत्व त्या करणार आहेत. या यशामागे लायन्स परिवार, कुटुंबीय तसेच पतीचे मिळालेले पाठबळ महत्त्वाचे असल्याची भावना सौ. चव्हाण यांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page