मालवण (प्रतिनिधी)
वीज महावितरण, ग्राहक पंचायत शाखा मालवण आणि वीज ग्राहक यांची संयुक्त ‘ऊर्जा मित्र बैठक’ राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. उपविभागीय कार्यालय मालवण येथे पार पडली. या बैठकीत वीज ग्राहकांच्या तक्रारींचे समन्वयाने निवारण होण्यासाठी चर्चा करण्यात आली
‘ऊर्जा मित्र बैठक’ प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी आयोजित करण्यात येते. मे २०२६ ते जुलै २०२६ या कालावधीत किती काळासाठी विजपुरवठा खंडित राहिला या बाबत माहिती मिळावी, अशी मागणी ग्राहक पंचायत, शाखा मालवण यांच्यावतीने उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबत योग्य ती माहिती दिली जाईल, असे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. तर ट्रान्फॉर्मर मंजूर होऊनही अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याची मागणी कुंभारमाठ हुतात्मा स्मारक परिसरातील तक्रारदार ग्राहकांनी यावेळी निवेदनाद्वारे केली.
यावेळी मालवणचे विद्युत वितरण उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा मालवण अध्यक्ष श्रीकांत वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष प्रताप बागवे, संघटक नितीन वाळके, सहघटक महेश काळसेकर, सचिव निळकंठ मालणकर, जिल्हा सदस्य प्रमोद मोहिते, सल्लागार रत्नाकर कोळंबकर, वीजग्राहक पुष्कराज तायशेटे, सदाशिव आरोलकर, रविंद्र धुरी, सचिन गवंडे,
