Headlines

आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना धान्य वाटप…

⚡सावंतवाडी, ता. १७-: सावंतवाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा राज्याचे माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने सावंतवाडी नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना धान्याचे वाटप करण्यात आले.

समाजातील कष्टकरी घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख तथा नगरसेविका ॲड. नीता सावंत-कविटकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक, पंचायत समिती सदस्या प्रणाली टिळवे, अजय गोंदावळे, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, अर्चित पोकळे, शैलेश मेस्त्री, सुनील नाईक, हर्षा जाधव, सुप्रिता धारणकर, पूजा नाईक, भारती परब, राजश्री निर्गुण, निलम कुमठेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरपालिकेतील सर्व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले असून, समाजातील स्वच्छता राखण्यासाठी योगदान देणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा यानिमित्ताने सन्मान करण्यात आला.

You cannot copy content of this page