Headlines

बांदा विठ्ठल मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे रविवारी महा रक्तदान शिबिर; शेतकऱ्यांना मोफत काजू व सुपारी कलमांचे वाटप

⚡बांदा ता.१७-: येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विठ्ठल मंदिर (बांद्याचा बाप्पा) यांच्या वतीने यंदाच्या ७ व्या वर्षानिमित्त रविवार दिनांक १९ जुलै रोजी महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
“रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान, यानेच वाचतील हजारो प्राण!” या संदेशासह आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरातून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, हा प्रमुख उद्देश आहे. “रक्तदान हेच जीवनदान” या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत मंडळ गेली अनेक वर्षे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे.
याचबरोबर शेतकरी बांधवांसाठी मोफत काजू व सुपारी कलमांचे वाटप करण्यात येणार आहे. “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश देत पर्यावरण संवर्धनास चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बांदा शहर व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.
सामाजिक आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि कृषी विकास यांचा संगम घडविणाऱ्या या उपक्रमांना नागरिकांनी व शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विठ्ठल मंदिर, बांदा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page