Headlines

आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेर्ले शाळा व अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

⚡सावंतवाडी ता.१७-: माजी मंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेर्ले गावातील सर्व प्राथमिक शाळा व अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या उपक्रमाचे गावकऱ्यांनी स्वागत केले.

यावेळी सावंतवाडी तालुका शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे, उपतालुकाप्रमुख जीवन लाड, सावंतवाडी पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, माजी सरपंच चंद्रकांत राणे, विभागीय प्रमुख विनायक सावंत, ग्रामपंचायत सदस्य बाळा गावडे, सोमनाथ राऊळ, संजय घाडी, अनिल लिंगवत, माजी सैनिक बाळकृष्ण राऊळ, सदा कदम तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वेर्ले गावातील सर्व प्राथमिक शाळा आणि सर्व अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले. तसेच आमदार दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

You cannot copy content of this page