Headlines

सावंतवाडीतील नेत्रतपासणी शिबीर पुढे ढकलले

सावंतवाडी, ता.१०: येथील मुक्ता ऑप्टिशियन्सच्या वतीने उद्या, रविवारी आयोजित केलेले नेत्रतपासणी शिबीर पुढे ढकलण्यात आले आहे. हे शिबीर आता पुढच्या मंगळवारी, १८ जानेवारीला होणार असून नेत्रतज्ज्ञ डॉ. अश्विन डिसोझा रुग्णांची तपासणी करणार आहेत. याची नोंद रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी घेऊन या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुक्ता ऑप्टीशियन्सच्या वतीने करण्यात आले आहे.

Read More

कुणकेरी आंबेगाव रस्त्यासाठी सुरू केलेले उपोषण घेतले मागे

१५ जानेवारी पर्यंत काम सुरू करण्याचे दिले आश्वासन *⚡सावंतवाडी ता.१०-: कुणकेरी आंबेगाव रस्त्यासाठी आज येथील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण सायंकाळी उशिरा मागे घेण्यात आले आहे. बांधकामचे उपअभियंता अनिल आवटी यांनी येत्या १५ जानेवारीपर्यंत रस्त्याचे काम सुरू करू असे लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र दिलेल्या मुदतीत काम सुरू…

Read More

शिष्यवृत्ती परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी व्हावेत यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार…

देवगड सभापती लक्ष्मण उर्फ रवी पाळेकर यांचे प्रतिपादन.. देवगड-प्रतिनिधी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये देवगड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले यश कौतुकास्पद आहे. मात्र यापुढे या तालुक्यातील निकाल हा शंभर टक्के लागण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहीजे. तालुकास्तरीय चाचणी परीक्षा घेण्याचा उपक्रम खंडीत झाला होता तो पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी प्रयत्नशील राहणार आहोत. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जास्तीत जास्त सहभाग…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शासकीय जागेत उभारण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश

मराठा समाज,छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळाच्या भूमिकेकडे लक्ष *⚡कणकवली ता.१०-:* कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच पुतळा नेमका कुठे स्थलांतरित करावा याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस येथे पार पडलेल्या बैठकीत सदरचा पुतळा प.स.लगतच्या 18 गुंठे शासकीय जागेत स्थलांतरित करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले असल्याने आता नवीन वादाला तोंड फुटण्याची…

Read More

ओझर विद्यामंदिरमध्ये ‘राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम’ संपन्न

*⚡मालवण ता.१०-:* जिल्हा क्षयरोग केंद्र, सिंधुदुर्ग, या शाखेच्या मालवण विभागाच्यावतीने ‘राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम’ कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर या प्रशालेमध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचे मालवण विभागाचे मुख्य आरोग्य पर्यवेक्षक- मनोजकुमार मालंडकर यांनी क्षयरोग दुरीकरणाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्य आरोग्य पर्यवेक्षक- मनोजकुमार मालंडकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये क्षयरोग प्रसाराची कारणे, क्षयरोगाची लक्षणे,…

Read More

कुडाळ नगरपंचायतमध्ये तीन उमेदवारांची माघार

चार जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात *⚡कुडाळ ता.१०-: कुडाळ नगरपंचायतच्या चार जागांपैकी सद्य स्थितीत ३ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी १४ उमेदवारांपैकी ३ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने ११ उमेदवारांमध्ये ही निवडणूक होणार आहे. तर प्रभाग १६ मधील भाजप उमेदवाराचे निधन झाल्याने त्या प्रभागातील निवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय निवडणूक आयोगाने कळवला नसल्याने ही निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता…

Read More

भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य मनस्वी घारे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

५० व्या वाढदिनी दिविजा वृद्धाश्रमाला दिल्या जीवनावश्यक वस्तू देवगड-प्रतिनिधी-: जिल्हा परिषदेच्या सदस्या मनस्वी घारे यांनी आपल्या 50 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिविजा वृध्छाश्रम येथील वृध्द व्यक्तींना जीवनावश्यक वस्तु भेट स्वरुपात देवून एक सामाजिक बांधिलकि जोपासली आहे. किंजवडे जिल्हा परिषदेच्या सदस्या मनस्वी घारे यांनी आपल्या 50 व्या वाढदिवसाचे ऑचित्य साधून दिविजा वृध्दाश्रमातील वृध्द व्यक्तींना त्यांच्या मागणीनुसार…

Read More

ट्रॅव्हल व्यावसायिक रत्नाकर बिरमोळे यांचे निधन

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला घेतला जगाचा निरोप मालवण दि प्रतिनिधी मालवणातील ट्रॅव्हल व्यावसायिक आणि घुमडे गावचे रहिवासी रत्नाकर हरी बिरमोळे (५४ ) यांचे काल रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास खाजगी रुग्णालयात निधन झाले. आज १० जानेवारी हा दिवस त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या वाढदिवसा दिवशीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची पाळी कुटुंबियांवर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती. घुमडे…

Read More

देवगड मुख्याध्यापक संघाच्या रंगभरण स्पर्धेचा निकाल जाहीर

*⚡देवगड ता.१०-:* भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देवगड तालुका मुख्याध्यापक संघाने आयोजित केलेल्या माध्यमिक शाळातील पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा दोन गटात घेतलेल्या रंगभरण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. पाचवी ते सातवी गट प्रथम:- आर्या विनोद चौगुले (देवगड हायस्कूल) द्वितीय:- कल्पक दत्ताराम कोकरे (पडेल हायस्कूल) तृतीय :-वेदांत दत्तात्रय साळुंके (तळेबाजार हायस्कूल) उतेजनार्थ स्वराली…

Read More

नाभिक संघटनेच्या वतीने वीर कोतवाल यांची जयंती साजरी

*⚡मालवण ता.१०-:* मालवण तालुका नाभिक संघटनेच्या वतीने भैरवी देवालय, मालवण येथे वीर कोतवाल जयंती साजरी करण्यात आली. परकियांच्या पाशातून देश मुक्त करण्यासाठी आपल्या सर्वस्वाचे बलिदान देणारे नाभिक समाजाचे दैवत वीर भाई कोतवाल यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे, असे प्रतिपादन यावेळी नाभिक संघटनेचे प्रांत संघटक विजय चव्हाण यांनी मांडले. यावेळी नाभिक संघटनेचे मालवण तालुकाध्यक्ष आनंद आचरेकर,…

Read More
You cannot copy content of this page