१५ जानेवारी पर्यंत काम सुरू करण्याचे दिले आश्वासन
*⚡सावंतवाडी ता.१०-: कुणकेरी आंबेगाव रस्त्यासाठी आज येथील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण सायंकाळी उशिरा मागे घेण्यात आले आहे. बांधकामचे उपअभियंता अनिल आवटी यांनी येत्या १५ जानेवारीपर्यंत रस्त्याचे काम सुरू करू असे लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
मात्र दिलेल्या मुदतीत काम सुरू न झाल्यास उपोषण नाही तर थेट कार्यालयात धडक देऊ असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला.
