देवगड सभापती लक्ष्मण उर्फ रवी पाळेकर यांचे प्रतिपादन..
देवगड-प्रतिनिधी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये देवगड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले यश कौतुकास्पद आहे. मात्र यापुढे या तालुक्यातील निकाल हा शंभर टक्के लागण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहीजे. तालुकास्तरीय चाचणी परीक्षा घेण्याचा उपक्रम खंडीत झाला होता तो पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी प्रयत्नशील राहणार आहोत.
शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेण्यासाठी पालक व विद्यार्थी यांना योग्य मार्गदर्शन केले जाईल असे प्रतिपादन देवगड सभापती लक्ष्मण उर्फ रवी पाळेकर यांनी केले. जामसंडे येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात सोमवारी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती संघटनेच्यावतीने प्राथमिक विभागातील शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत २७ विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती पाळेकर, पंचायत समिती सदस्य अजित कांबळे, गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात, जिल्हा उपाध्यक्ष उल्हास मणचेकर, लहू दहीफळे, जिल्हा नेते अशोक जाधव, जिल्हाध्यक्ष सचिन जाधव, जिल्हा सरचिटणीस प्रकाश वाडकर, तालुकाध्यक्ष आनंद जाधव, तालुका सचिव आरेश भोसले, उपाध्यक्ष अवधूत घोडके, कार्याध्यक्ष मंगेश देवळे, सहसचिव वैभव चौबे, संघटक नितिन कांबळे, महिला प्रतिनिधी संगीता जाधव, शितल मयेकर, कृतिका सकपाळ, वेदा साळसकर, मथुरा सकपाळ आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना पाळेकर यांनी देवगड तालुक्यात सराव चाचणी परीक्षा देवगड परीक्षा समितीच्यावतीने घेण्यात येत असते. काही वर्षे हा उपक्रम बंद आहे.
यासाठी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी या परीक्षा घ्याव्यात अशी मागणी केली आहे. या परीक्षा पुन्हा सुरू करण्यासाठी आपण सर्वच पंचायत समिती सदस्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतील सहभाग जास्तीत जास्त व्हावा तसेच निकाल शंभर टक्के यावा यासाठी परिश्रम घ्यावेत असे सांगितले. पंचायत समिती सदस्य अजित कांबळे यांनी शिक्षकाशिवाय माणूस घडू शकत नाही. शिक्षकच माणूस घडविणारा कलाकार आहे. कोरोनाच्या काळातही सर्व नियम पाळून शिष्यवृत्तीमध्ये उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचा गौरव संघटनेनी करणे हे कौतुकास्पद शिष्यवृत्तीच्या यशाबरोबरच विद्यार्थ्यांचा कल कशात आहे यासाठी त्यांच्यातील उपजत गुणांचा शोध घ्यावा असे मत व्यक्त केले.
तर गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात यांनी कोरोनाही असताना संघटनेच्या शिक्षकांनी एक चांगला उपक्रम राबविला कठीण काळातही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचे चांगले कार्य पहले आहे. यश मर्यादीत न ठेवता याचा आलेख हा वाढला पाहीजे. अजूनही जीवनात अनेक स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. त्यातून या जिलातून चांगले अधिकारीवर्ग निर्माण झाले पाहीजेत असे सांगितले. जिल्हाध्यक्ष जाधव यांनी देवगड तालुक्यातील प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांचे यश हे गुणवत्ता वाढविणारा आहे.
कोकण विभागातच जिल्हा अव्वल न ठरता राज्यातही अव्वल ठरविण्याचा प्रयत्न शिक्षकवर्ग सातत्याने करीत आहेत असे सांगितले. यावेळी त्यांनी संघटनेच्यावतीने देण्यात येणारा ल. रा. जाधव स्मृती राज्यस्तरीय नेतृत्व पुरस्कार कोव्हापूर जिल्हयाला देण्यात येत आहे. याचे वितरण रत्नागिरी येथे आयोजित कार्यक्रमात केले जाईल अशी घोषणा केली. यावेळी मुंबरकर, दहीफळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, पत्रकार संतोष कुळकर्णी विद्यार्थ्यांमधून प्राजक्ता भिडे, हर्ष लळीत तर शिक्षकांमधून बापू खरात, प्रणाली मराठे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संगीत गीत गायन स्पर्धेत यश प्राप्त केल्याबद्दल सचिन जाधव यांचा तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त बापू खरात यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सचिन जाधव यांनी केले. सुत्रसंचालन आनंद जाधव यांनी केले तर आभार प्रकाश वाडकर यांनी मानले. फोटो- शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश मिळविल्या बददल हर्ष लळीत याचा सत्कार करताना मान्यवर आदी छाया-वैभव केळकर
