दीपक केसरकर, निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती; गोविंद चित्रमंदिर येथे सकाळी १०.३० वाजता आयोजन..
⚡सावंतवाडी ता.१८-: शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन उद्या बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता सावंतवाडी शहरातील गोविंद चित्रमंदिर येथे करण्यात आले आहे.
या सोहळ्यास सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकभाई केसरकर तसेच कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेशजी राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या अभिष्टचिंतन सोहळ्यास शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख, युवा सेना जिल्हाप्रमुख, सर्व तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच तसेच विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनीही उपस्थित राहून संजू परब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन सावंतवाडी शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
‘कृष्ण हनुमान युद्ध’ नाट्यप्रयोगाचे आयोजन
दरम्यान, सह्याद्री फाउंडेशन सावंतवाडीच्या वतीने माजी अध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ, दोडामार्ग यांचा ‘कृष्ण हनुमान युद्ध’ हा दशावतारी नाट्यप्रयोग बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता गोविंद चित्रमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.
सर्व नाट्यप्रेमींनी या नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ व विद्यमान अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांनी केले आहे.
