Headlines

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची वेंगुर्ला पंचायत समितीला भेट

वेंगुर्ला
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी आज वेंगुर्ला पंचायत समिती कार्यालय येथे भेट दिली. यावेळी सभापती दालनात त्यांचा वेंगुर्ला पं. स. च्या वतीने सभापती शंकर घारे व उपसभापती सचिन देसाई यांच्यामार्फत शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, तुळसचे रामचंद्र परब, वाफोली सरपंच विनेश गावडे, निगुडे माजी सरपंच आत्माराम गावडे, मातोंड ग्रा. पं. सदस्य व पत्रकार दिपेश परब, पत्रकार अजय गडेकर, आडेली माजी ग्रा. पं. सदस्य विष्णू कोंडसकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page