Headlines

तळवडे येथे आगीमध्ये नुकसान झालेल्या त्या व्यवसायिकाला जिल्हापरिषद सदस्य संदिप गावडे यांची मदत…

⚡सावंतवाडी ता.१८-: तळवाडे येथे विजय कुंभार यांच्या दुकानाला शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती. यामध्ये दुकानाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने येथील श्री कुंभार यांना पुन्हा त्यांचा व्यवसाय उभा करण्यासाठी मदतीची आवश्यकता होती.

याची दाखल घेत आज तळवडे जिल्हापरिषद मतदार संघाचे सदस्य श्री संदिप गावडे यांच्या माध्यमातून कुंभार यांना अर्थिल मदत करण्यात आली आहे. सदर रक्कम आज तळवडे भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून श्री कुंभार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. यावेळी माजी सभापती पंकज पेडणेकर, शंकर सावंत, विकास गावडे , प्रेमानंद डिचोलकर, मधुसूदन तळवणेकर,दिपक कोरगांवकर,सुशांत गावडे,सुभाष पेडणेकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page