Headlines

अमली पदार्थविरोधी शपथ घेऊन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत स्वातंत्र्यदिन साजरा

देशभक्तीपर गीत-नृत्याने आणली रंगत

कुडाळ : येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या वतीने अमली पदार्थविरोधी शपथ, तसेच बहारदार देशभक्तीपर गीत-नृत्यांच्या सादरीकरणातून भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेअंतर्गत फिजिओथेरपी महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज, सीबीएसई सेंटर स्कूल, बी.एड. कॉलेज, आर्ट्स-कॉमर्स-सायन्स नाईट कॉलेज, आर्ट्स-कॉमर्स-सायन्स महिला कॉलेज आणि ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीत संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत आणि नृत्यांचे बहारदार सादरीकरण केले. या सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या भावनेने भारावून गेले. यावेळी विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहण्याची तसेच समाजात नशामुक्तीचा संदेश पोहोचविण्याची शपथ घेतली.
दरम्यान, नऊ वर्षांखालील राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निरजा राजेश पवार हिचा तसेच पोलिसांच्या नशामुक्ती अभियानात सहभागी झालेल्या सीबीएसई विद्यार्थ्यांच्या टीमचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना चेअरमन उमेश गाळवणकर म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आपण आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे योगदान दिले तरच देश अधिक बलशाली होईल. ‘देश प्रथम’ ही भावना मनात ठेवून प्रत्येकाने आपले काम देशासाठी अर्पण केल्यास भारताचा तिरंगा जगभरात अभिमानाने फडकत राहील, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार जोशी, अश्विनी परब, कृपा राणे आणि कनिका मोरजकर यांनी केले.

You cannot copy content of this page