नाभिक संघटनेच्या वतीने वीर कोतवाल यांची जयंती साजरी

*⚡मालवण ता.१०-:* मालवण तालुका नाभिक संघटनेच्या वतीने भैरवी देवालय, मालवण येथे वीर कोतवाल जयंती साजरी करण्यात आली. परकियांच्या पाशातून देश मुक्त करण्यासाठी आपल्या सर्वस्वाचे बलिदान देणारे नाभिक समाजाचे दैवत वीर भाई कोतवाल यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे, असे प्रतिपादन यावेळी नाभिक संघटनेचे प्रांत संघटक विजय चव्हाण यांनी मांडले.

यावेळी नाभिक संघटनेचे मालवण तालुकाध्यक्ष आनंद आचरेकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. प्रतिभा चव्हाण, सचिव पलाश चव्हाण, खजिनदार अंकुश चव्हाण, संघटनेचे ज्येष्ठ सदस्य बापूजी चव्हाण, अरविंद चव्हाण, उत्तम चव्हाण, दीपक चव्हाण, शुभम लाड, सूर्यकांत चव्हाण, दिलीप चव्हाण, जगदीश वालावलकर व महिला सदस्या दिपाली शिंदे माजी अध्यक्ष विजय शिवा चव्हाण, अश्विनी आचरेकर, कांचन चव्हाण, सुनिता चव्हाण, उज्वला चव्हाण, शैलजा चव्हाण, गायत्री चव्हाण, विनता चव्हाण, रंजना चव्हाण, तृप्ती वालावलकर, विजयालक्ष्मी चव्हाण, रुचिका चव्हाण उपस्थित होत्या. यावेळी श्री. चव्हाण म्हणाले,

नाभिक समाजाचा आज देश पातळीपर्यंत विकास झाला आहे. समाजात संघटीतपणा वाढत आहे, यामागे श्री संतसेना महाराज, शिवाजी महाराजांचा जिवासाठी जीव देणारा शिवा काशीद व हुतात्मा वीर भाई कोतवाल यांची प्रेरणा आहे. संघटनेचे माजी सचिव कांता चव्हाण यांनी जयंती निमित्त वीर कोतवाल यांनी देशाप्रती केलेल्या कार्याची ओळख करून दिली.

You cannot copy content of this page