वेंगुर्ला
भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्यामार्फत तुळस येथील सर्पमित्र महेश राऊळ (तुळस ) व अडचणीत सापडलेल्या जीवांचे प्राण वाचविण्याचे कार्य जोपासणाऱ्या रामदास नाईक(तुळस )यांचा सोमवारी तुळस येथे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, वेंगुर्ला उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, वेंगुर्ला सभापती शंकर घारे, तुळस ग् सरपंच रश्मी परब, वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सचिन परुळकर, माजि उपसरपंच सदस्य सचिन नाईक, ग्रा.पं. सदस्य जयवंत तुळसकर, रामचंद्र परब, सुधीर चूडजी, गुरु सावंत, प्रदीप परुळकर, अवधूत तुळसकर, सागर सावंत, मुंबई येथील सेवानिवृत्त एएसआय सुधीर चूडजि, सागर सावंत, महेश राऊळ, विवेक तिरोडकर, अण्णा परुळकर, प्रज्वल परुळकर आदीसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
भाजपातर्फे तुळस येथील सर्पमित्र महेश राऊळ, रामदास नाईक यांचा सन्मान
