गुरु मठकर यांचा उपक्रम:जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ४ येथे कार्यक्रम संपन्न..
सावंतवाडी, ता. १८ : येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ४, खासकीलवाडा येथे शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते गुरु मठकर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. यावेळी पत्रकार सिताराम गावडे, शिक्षक तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
