देवगड-जामसांडे नगरपंचायत चार जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात
*⚡देवगड ता.१०-:* देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 10 जानेवारी 2022 रोजी 1 उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर चार जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असणार आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक 8 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले वैभव मिलिंद केळकर यांनी अखेर आपला नामनिर्देशन अर्ज मागे घेतला आहे.
देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 4,5,7,8 नगरपंचायतीचे हे प्रभाग नामाप्र साठी राखीव ठेवण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हे चारही प्रभाग सर्व साधारण् राहणार आहेत अशा आदेशानंतर या चारही प्रभागांची निवडणुक पुढे ढकलण्यात आली आहे. या चार प्रभागांची निवडणुक 18 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. या प्रभाग क्रमांक 4 मध्ये मनिषा अनिल घाडी (शिवसेना) विरुध्द मृणाली महेश भडसाळे (भाजपा) यांच्यामध्ये लढत होणार आहे. तर प्रभाग क्रमांक 5 मधून सुजाता उमेश कुलकर्णी (काँग्रेस) व मनिषा अनिल जामसंडेकर (भाजपा) यांच्यामध्ये लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक 7 मधून रोहण विश्वनाथ खेडेकर (शिवसेना),योगेश प्रकाश चांदोस्कर(भाजपा),प्रुफुल्ल भिकाजी कणेरकर (अपक्ष),सौरभ सुर्यकांत कुलकर्णी (अपक्ष), व राजेंद्र बाळकृष्ण मेस्त्री (अपक्ष) यांच्यामध्ये लढत होणार आहे. तर प्रभाग क्रमांक 8 मधुन संतोष रविंद्र तारी (शिवसेना),निधी नयन पारकर (भाजपा),प्रणव चंद्रकांत नाडणकर(अपक्ष) यांच्यामध्ये लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक 7 मधील भाजपाचे उमेदवार व माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांच्या समोर शिवसेनेचे रोहन खेडेखर यांचे तगडे आवाहन आहे तर अपक्ष उमेदवार प्रुफुल्ल कणेरकर हे ही भाजपाचेच कार्यकर्ते असल्यामुळे त्यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे भाजपा पक्षासमोर एक मोठे आवाहन आहे तर अपक्ष उमेदवार राजेंद्र मेस्त्री व सौरभ कुलकर्णी हे ही निवडणुक रिंगणात असल्यामुळे प्रभाग क्रमांक 7 हा देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील लक्षवेधी मतदार संघ ठरणार आहे. या प्रभागामध्ये माजी नगराध्यक्ष उमेश कणेरकर यांनी अनेक विकासकामे केली आहेत. यामुळे भाजपचे उमेदवार योगेश चांदोस्कर यांच्या बाजूने हि एक जमेची बाजू आहे.
