Headlines

मिल्लत फाउंडेशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

७६ जणांची नोंदणी; ६३ रक्तदात्यांनी केले रक्तदान

कुडाळ : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉल, रेल्वे स्टेशन रोड येथे सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात ७६ रक्तदात्यांनी नोंदणी केली, तर ६३ जणांनी प्रत्यक्ष रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
प्रसिद्ध उद्योजक अब्बास आदम खुल्ली यांच्या हस्ते फीत कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी रक्तदात्यांचे कौतुक केले. उद्योजक मुश्ताक शेख, विद्याधर कुडाळकर, साबू सिद्दीक कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या १९८६ बॅचचे माजी विद्यार्थी, गटनेते तथा नगरसेवक विलास कुडाळकर, नगरसेवक मंदार शिरसाट, उदय मांजरेकर, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका अफरीन करोल, अभी गावडे, एजाज नाईक, हाफिस शेख, मोबीन दोस्ती, शेखर गवंडे, इम्रान खान, अमित राणे, राजवीर पाटील, राजू गवंडे, हाफीज नाझीम आदी मान्यवरांनी शिबिराला भेट देऊन रक्तदाते व आयोजकांचे कौतुक केले.

सहा वर्षांपासून रक्तदानाची चळवळ

सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन गेल्या सहा वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. नवीन रक्तदाते तयार करणे, नागरिकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करणे आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी सहकार्य करणे, या उद्देशाने फाउंडेशनतर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत.
कोरोना महामारीच्या कठीण काळातही फाउंडेशनने गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणात मदत केली. याशिवाय गरजूंसाठी पेशंट बेड, व्हीलचेअर तसेच अन्य आवश्यक वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याचे कामही करण्यात आले आहे.
‘रक्तदान हीच जीवनदानाची सेवा’ या भावनेतून दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. रक्तदानामुळे एखाद्या गरजू रुग्णाचा जीव वाचविण्याची संधी मिळते. त्यामुळे युवकांसह सर्व नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

६३ रक्तदात्यांचा सहभाग

शिबिरात शहाजी सिराज पाटील, अब्बास अली सय्यद, सादतहुसेन अश्रफहुसेन नाईक, रेहान अरशद आवटे, अल्ताफ अब्दुल्ला काझी, अब्बास आदम खुल्ली, निसार हुसेनसाब मणीयार, बशीरुद्दीन उस्मान शेख, रफीक अलाबक्ष शेख, वजीर परवेज मुजावर, परवेज नाईक, शांताराम गावकर, इझान अताफ शेख, मोहम्मद रफीक हुसेनसाब मणीयार, नाझीर हुसेन अल्ताफ शेख, जफर अब्दुल रहमान जमादार, तोहित अल्ताफ शेख, मोहसिन खुतबुद्दीन जद्दी, विक्रम जाधव, सादिक कादर मेमन, जावेद लियाकत खुल्ली, वसीम सादिक सय्यद, इसाक अन्वर मुजावर, जहेज गौस शेख, अनिकेत महेश तेंडुलकर, सुकृत नागेश कराळकर, गोविंद रामचंद्र कोरगावकर, शब्बीर कादर मेमन, सुलताना सादतहुसेन नाईक, अफरीन अब्बास करोल, जमीर मुनीर पटेल, अरशद आसिफ दोस्ती, प्रसाद सावंत, नाझिम इकबाल मुकादम, जतीयाज शमशुद्दीन करोल, अम्मार अजीम शेख, फरहान उमर खान, अल्ताफ इसाक मणियार, इस्माईल सादिक बागवान, मुबीन सलीम दोस्ती, राहील इब्राहिम शहा, इक्बाल इरफान दोस्ती, असगरअली सय्यद शहा, सोहेल इलियास शेख, संकेत संजय कुडाळकर आदींनी रक्तदान केले.
फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत उपस्थित मान्यवरांनी भविष्यातही रक्तदान, गरजूंसाठी मदत आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांचा हा प्रवास अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहावा, यासाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page