संजू परब यांनी कार्यक्रमाला भेट देत दिल्या शुभेच्छा: मंडळाला ११ हजारांची मदत देखील केली जाहीर..
⚡सावंतवाडी ता.१७-: माजगाव येथील संगीत मित्र मंडळाच्या वतीने श्रावण मासानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री महादेव सातेरी प्रसन्न या भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला भाविक व संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भजन, भक्तिगीते व संगीताच्या माध्यमातून भगवान महादेवाची आराधना करण्यात आली. कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी कार्यक्रमाला भेट देऊन मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले. धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी मंडळाकडून सुरू असलेल्या उपक्रमांना प्रोत्साहन देत त्यांनी मंडळाला ११ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. त्यांच्या या सहकार्याबद्दल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले.
