ट्रॅव्हल व्यावसायिक रत्नाकर बिरमोळे यांचे निधन

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला घेतला जगाचा निरोप

मालवण दि प्रतिनिधी मालवणातील ट्रॅव्हल व्यावसायिक आणि घुमडे गावचे रहिवासी रत्नाकर हरी बिरमोळे (५४ ) यांचे काल रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास खाजगी रुग्णालयात निधन झाले.

आज १० जानेवारी हा दिवस त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या वाढदिवसा दिवशीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची पाळी कुटुंबियांवर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती. घुमडे गावचे रहिवासी असणारे रत्नाकर बिरमोळे हे मनमिळाऊ आणि परोपकारी वृत्तीचे होते. मालवणच्या ट्रॅव्हल व्यवसायात त्यांनी बऱ्यापैकी जम बसविला होता. या व्यवसायामुळेच त्यांचा मित्रपरिवार दांडगा होता. काल रविवारी रत्नाकर हे खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी गेले होते त्यावेळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. देवबाग येथील हॉटेल व्यावसायिक बाबू बिरमोळे यांचे ते भाऊ होत.

You cannot copy content of this page