भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य मनस्वी घारे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

५० व्या वाढदिनी दिविजा वृद्धाश्रमाला दिल्या जीवनावश्यक वस्तू

देवगड-प्रतिनिधी-: जिल्हा परिषदेच्या सदस्या मनस्वी घारे यांनी आपल्या 50 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिविजा वृध्छाश्रम येथील वृध्द व्यक्तींना जीवनावश्यक वस्तु भेट स्वरुपात देवून एक सामाजिक बांधिलकि जोपासली आहे.

किंजवडे जिल्हा परिषदेच्या सदस्या मनस्वी घारे यांनी आपल्या 50 व्या वाढदिवसाचे ऑचित्य साधून दिविजा वृध्दाश्रमातील वृध्द व्यक्तींना त्यांच्या मागणीनुसार जीवनावश्यक वस्तू भेट स्वरुपात दिल्या आहेत. यापुर्वी देखील त्यांनी कोरोना विषाणूच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद गटामधील येणा-या सर्व गावांमध्ये गरीब व्यक्तींना जीवनावश्यक वस्तू दिल्या आहेत.

तसेच काहि प्राथमिक शाळांना देखील त्यांनी पिण्याच्या पाण्याची देखील सोय केली आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रातही गोर गरीब विदयार्थ्यांना अनेकवेळा मदत केली आहे. घारे या जिल्हा परिषद सदस्य पदी विराजमान झाल्यापासून गेल्या पाच वर्षामध्ये विकास कामांबरोबर त्यांनी स्वखर्चातूनही सामाजिक बांधिलकिच्या उदधार भावनेतून गोरगरीब जनतेला त्या मदत करीत आहेत. यावेळी त्या बोलताना म्हणाल्या की, लोकप्रतिनिधींनी विकास कामे हि करायचीच असतात तर या पलिकडे जावून आपल्या परिस्थितीनुसार गोरगरीब जनतेला सहकार्य करणे हे महत्वाचे आहे. आपण व्यवसाय व नोकरी करीत असताना समाज कार्यासाठी काहि तरी देणे असतो या भावनेतून आपण समाजासाठी प्रत्येक व्यक्तीने छोटे मोठे कार्य केले पाहिजे असे त्यांनी विचार मांडले. फोटो- दिविजा वृध्दाश्रमाला जीवनावश्यक वस्तुंची भेट देताना जिल्हा परिषद सदस्या मनस्वी घारे छाया-वैभव केळकर

You cannot copy content of this page