Headlines

एका उमेदवाराने घेतली माघार

देवगड-जामसांडे नगरपंचायत चार जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात *⚡देवगड ता.१०-:* देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 10 जानेवारी 2022 रोजी 1 उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर चार जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असणार आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक 8 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले वैभव मिलिंद केळकर…

Read More

दिव्यांग निधी प्राधान्य क्रमाने तालुका निहाय मंजूर करा

पालकमंत्री उदय सामंत *⚡सिंधुदुर्गनगरी ता.१०-: जिल्हा परिषद स्व उत्पन्नातील 5 टक्के दिव्यांग सेस निधी तालुका निहाय प्राधान्य क्रमाने मंजूर करावा अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. 5 टक्के दिव्यांग सेसे निधीच्या नियंत्रणासाठीच्या जिल्हास्तरीय समितीची आज जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहामध्ये बैठक झाली. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी…

Read More

आलेल्याक्रास्ट्राईब कर्मचारी संघटना आरोग्य विभाग सिंधुदुर्ग अध्यक्षपदी शंकर कदम महासचिवपदी दिपक कांबळे

*⚡कणकवली ता.१०-:* क्रास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हा अध्यक्ष संदिप कदम यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या त्रैमासीक सभेत आरोग्य विभागाच्या अध्यक्षपदी शंकर जयराम कदम व महासचिवपदी दिपक वामन कांबळे व जिल्हा कोषाध्यक्षपदी संजय अजबराव कडू व उपाध्यक्षपदी संजय प्रभाकर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या आदेशान्वये मंत्रालयीन सचिव सुरेश तांबे, राज्य…

Read More

गोवा बनावट दारूच्या 35 बॉक्स सह 8 लाख 69 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त

एकास अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई *⚡ओरोस ता.१०-: गोवा – मुंबई महामार्गावर ओसरगाव टोल नाक्या नजीक पांढऱ्या रंगाच्या महिद्रा झायलो कारमधून गोवा बनावटीची दारूचे 35 बॉक्स असा एकूण 8 लाख 69 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त करून एकास अटक केली, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र घाग यांनी दिली….

Read More

बाजारासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांना दोन्ही लस बंधनकारक

तलावाकाठी लागला सूचना फलक *⚡सावंतवाडी ता.१०-:* मंगळवारी होणाऱ्या आठवडा बाजारा हा ओमिक्रोन च्या वाढत्या रुग्णाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून लादलेल्या निर्बधाचे पालन करून होणार असून या बाजारसाठी येणारा व्यापाऱ्यांना कोविडच्या दोन लसीचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतची सूचना फलक तलावाकाठी लावण्यात आले आहेत.

Read More

तळेरे-वैभववाडी-करूळ घाट रस्त्याची दुरवस्था

डांबरीकरण न केल्यास आंदोलन;राजेश जाधव यांचा इशारा वैभववाडी प्रतिनिधी तळेरे-वैभववाडी-करुळ घाट रस्त्यावरती जागोजागी मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे.वाहन चालकांना खूप कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सदरच्या मार्गाचे तातडीने चांगल्या आणि टिकाऊ दर्जाचे डांबरीकरण करावे अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे कणकवली तालुका…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी काशीविश्वेश्वर मंदिरात महामृत्युंजय जप

*⚡कणकवली ता.१०-: पंजाबमध्ये सुरक्षेत चूक झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी कणकवली भाजपा महिला मोर्चाच्यावतीने कणकवली शहरातील काशीविश्वेश्वर मंदिरात 108 महामृत्युंजय जप करण्यात आला. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण,राजश्री धुमाळे,तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,जिल्हा बँक संचालक…

Read More

मालवण केंद्रावर राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी

*⚡मालवण ता.१०-: सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी २५ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत येथील मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यात मालवण केंद्रावर रोज सायंकाळी ६ वाजता या नाट्यप्रयोगांना सुरुवात होईल. रत्नागिरी केंद्रावर आठ संघ सहभागी झाले असून या केंद्रावरील स्पर्धेला १५ जानेवारीपासून प्रारंभ…

Read More

आंबडोस भराडी मंदिरात गोंधळ उत्सव

*⚡मालवण ता.१०-:आंबडोस येथील भराडी मंदिरात दि. ११ जानेवारी रोजी गोंधळ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ११ वाजल्यापासून देवीच्या ओट्या भरणे व दर्शन कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. रात्री १० पासून गोंधळ कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. ११ ते १ पर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन सर्व मानकरी व परब मानकरी यांनी केले…

Read More

ओमीक्रोनच्या पाश्वभूमीवरील नवीन नियमावली नागरिकांनी पाळावी

शहरात लॉकडाऊन करण्याची वेळ आणू नये;मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन *⚡सावंतवाडी ता.१०-: राज्यात ओमिक्रॉन या कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाचा वेग वाढत असून प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाने नवी नियमावली जाहीर केली आहे या नियमांचे सर्व नागरिकांनी पालन करून शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये म्हणून नगरपरिषदेस संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन मुख्यअधिकारी जयंत जावडेकर यांनी केले आहे….

Read More
You cannot copy content of this page